इनाम तर्फे रस्ते,गटारी,सफाई बाबत महापालिकेला निवेदन

इचलकरंजी-(शैलेंद्र चव्हाण)
इनाम आपल्या दारी उपक्रमांतर्गत आढळलेल्या इचलकरंजी शहरातील विविध समस्या त्वरित सोडवणेबाबत इचलकरंजी नागरिक मंच तर्फे उपायुक्त डॉ प्रदीप ठेंगल यांना निवेदन देण्यात आले.


१०७ कोटीच्या कामांतर्गत झालेल्या सारण गटारीना डहाळ केलेला नाही त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नाही.पंचवटी टॉकीज जवळील वृंदावन हॉटेल समोरची गटार, विवेकानंद कॉलनी जवळील रुग्गे कॉलनीतील गटार ही प्रातिनिधिक उदाहरणे असून अशाच पद्धतीने बऱ्याच भागात सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने ज्या गटारींना डहाळ केलेला नाही त्यांची पाहणी करून कार्यवाही करावी,सावली सोसायटी जवळील ऑक्सिजन पार्क समोरील मोठा रस्त्याची दुरावस्था झालेली असून वर्षांनुवर्षं रस्त्यात मोठे मोठे खड्डे पडले असून सदर रस्ता खराब झालेला आहे,शहापूर परिसरातील विठ्ठलनगर हमाल गल्ली नंबर ६ परिसरात रस्ते व गटारीच्या दुरावस्थेची समक्ष पाहणी करावी,कृष्णानगर परिसरात मुख्य रस्त्यावर गटार नसल्याने तेथे एक तिरका नळा टाकून पाणी पास केलेला आहे तो चोकप झाला की पाणी वारंवार रस्त्यावर येते व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो तेथेच गोशाळेस जागा दिलेली आहे तेथूनही खाली गटार करणे आवश्यक आहे जेणेकरून आरोग्याचा प्रश्न सुटेल.

इचलकरंजी शहरातील बऱ्याच सारण गटारी या जेसीबीच्या माध्यमातून स्वच्छ करणे आवश्यक आहे,सारण गटारीत प्लास्टिक बाटल्या व इतर प्लास्टिक पडल्यामुळे त्याची स्वच्छता करणे अवघड जात आहे,प्रत्येक सारण गटारीस सिमेंटच्या जाळया बसवून कचरा तेथेच वाट बंद करून फक्त पाणी पास केल्यास सफाई व्यवस्थेत सुसूत्रता येईल.

मदनलाल बोहरा मार्केटजवळ जाताना डाव्या बाजूस कित्येक महिने कचऱ्याचा ढीग पडला आहे तो उठाव करणे आवश्यक आहे,काळ्या ओढयातील प्लास्टिक कचरा व इतर मटेरियल जेसीबीच्या साहाय्याने स्वच्छ करणे आवश्यक आहे.या सर्व समस्या त्वरित सोडवण्याबाबतचा उल्लेख निवेदनात करण्यात आला.उपायुक्त ठेंगल यांनी सदर समस्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन शिष्टमंडळास दिले.


यावेळी इचलकरंजी नागरिक मंचचे राजु कोन्नुर,नितीन ठिगळे, दीपक पंडित, राम आडकी,जतीन पोतदार, रूपाली माळी,मीना कासार,डॉ सुप्रिया माने,संजय डाके,अमित बियाणी, महेंद्र जाधव, हरीश देवाडिगा,अभिजीत पटवा उपस्थित होते.

चर्चा करताना इनाम चे पदाधिकारी

महापालिकेने जेसीबी विकत घ्यावा.
इचलकरंजी महापालिकेच्या कामकाजाचा व्याप वाढला असून आरोग्य,बांधकाम व पाणीपुरवठा या तिन्ही विभागास जेसीबीची आवश्यकता भासते,जेसीबी भाडेतत्त्वावर घेतल्याने तासाच्या स्वरूपात घेतला जातो व बऱ्याच वेळा जेसीबीचे तास संपले असे कारण ऐकण्यास मिळते.त्यामुळे महापालिकेने स्वतः जेसीबी विकत घेतल्यास मक्ता पद्धतीने चालकाची नेमणूक केल्यास महापालिकेच्या कामकाजासाठी कायमस्वरूपी जेसीबी उपलब्ध राहील व गावातील
समस्या सोडवण्यास गती येईल असे अभिजित पटवा यांनी सांगितले-यावर जेसीबी खरेदी करण्याचा महापालिका प्रशासनाचा विचार असल्याचे डॉ ठेंगल यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *