पेन्शन संदर्भात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

इचलकरंजी(शैलेंद्र चव्हाण)


शासनाने जाहीर केलेली पेन्शन वाढ व केंद्र सरकारच्या फरकाची रक्कम मिळावी यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.तसेच यावेळी विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार पोळ यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात इचलकरंजी परिसरातील संजय गांधी, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना, अपंग यांना योजनेतुन पेन्शन घेणा-या लाभार्थ्याना शासनाने फेब्रुवारी २०२३ च्या केलेल्या बजेटमध्ये ५०० रुपयाची वाढ जाहीर केलेली आहे.ही वाढ सुध्दा तुटपुंजी वाढ आहे.

कमीत कमी ३००० रुपये या लाभार्थ्याना पेन्शनमध्ये वाढ मिळाली पाहिजे.यासाठी संघटनेच्यावतीने संजय गांधी कार्यालयावर अनेक प्रकारची आंदोलने व निवेदने दिलेली होती.परंतु महाराष्ट्राच्या सरकारने केलेल्या बजेटमध्ये ५०० रुपयाची वाढ ही घोषीत केलेली आहे.केलेल्या घोषणेला चार महिने होत आली अद्याप त्याची अंमलबजावणी झाली की नाही? हे महाराष्ट्राच्या व इचलकरंजीच्या लाभार्थ्यांना कळेनासे झालेले आहे.काय ही नुसती घोषणाच राहणार आहे?की लाभार्थ्यांची दिशाभूल करणार आहात.

तसेच इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना या योजनेतून त्या पेन्शन धारकांना राज्य सरकार ८०० व केंद्र सरकार २०० अशी मिळून १००० पेन्शन दिली जात होती. त्यामध्ये सुध्दा केंद्र सरकारचे २०० रुपये फरकाची रक्कम मिळावी म्हणून गेली २ वर्ष झाली संजय गांधी कार्यालयात इंदिरा गांधी वृध्दापकाळ पेन्शनधारकांनी फॉर्म भरून देवून सुध्दा अद्याप ती रक्कम मिळालेली नाही. तरी ती रक्कम
तात्काळ मिळावी

तसेच या राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या योजनेची सुध्दा अनुदान पंधरा दिवसात देण्याची तरतुद असताना देखील ती अद्याप काही लोकांना मिळालेली नाही. तसेच २०१९ मिळालेल्या मंजूर पत्राचे काही लाभार्थ्याचे फरकाची रक्कम अद्याप दिलेली नाही ती अदा करणेत यावी.

तसेच दिनांक २८/०२/२०२१ व २२ च्या लाभार्थ्याचे प्रकरण मंजूर होवून सुध्दा अद्याप पेन्शन मिळोलली नाही. वरील सर्व गोष्टीची तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा आपल्या कार्यालयाविरोधात याच्याही पेक्षा उग्र स्वरुपाचे आंदोलन करणेत येईल होणाऱ्या परिणामास हे कार्यालय जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे म्हटले आहे.

यावेळी कॉम्रेड भरमा कांबळे, कॉम्रेड सदा मलाबादे,कॉ.रामचंद्र धुमाळ,अर्जुन कांबळे,कल्पना माळगे यांसह लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *