शिवाजी नगर पोलिसांनी मोटारसायकल चोरांच्या आवळल्या मुसक्या,7 मोटार सायकली जप्त

इचलकरंजी-प्रतिनिधी
शिवाजीनगर पोलिसांनी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळून,7 मोटरसायकली जप्त केल्या असून सुमारे 1 लाख 68 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.यामध्ये चैतन्य उर्फ गणेश जटापा माळी (वय 23 ,जुना चंदुर रोड बरगे मळा इचलकरंजी),शुभम संजय कोणे (पाटील मळा इचलकरंजी), अर्जुन निवाते (दाते मळा इचलकरंजी) या तिघांना अटक केली असून ,त्यांना 26 जून पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे.

Advertise

याबाबत अधिक माहिती अशी की, रावसो कांबळे यांनी इचलकरंजी एसटी स्टँड च्या बाहेरील बाजूस आपली गाडी पार्किंग केली होती.यावेळी अज्ञात चोरट्यानी त्या ठिकाणाहून गाडी लंपास केली होती.याबाबत गाडी चोरून नेल्याबाबत फिर्याद दिली होती.या घटनेचा तपास करत असताना नदीवेस जॅकवेल येथील रोडवर,3 जण सुझुकी मॅक्स 100 मोटरसायकलचा संशयास्पद रित्या मिळून आली.

सदर इसमाना ताब्यात घेऊन चौकशी केली असता,त्यांच्या कब्जात वरील गुन्ह्यातील चोरीची मोटरसायकल मिळून आली.सदर संशयित आरोपींच्याकडे अधिक चौकशी केली असता,विविध ठिकाणाहून मोटरसायकल चोरीची कबुली दिली.यामध्ये अजून सहा मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

सदर कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके,उपनिरीक्षक मनोज पाटील, सुनील बाईत,गजानन बरगाले,विजय माळवदे,सतीश कुंभार,पवन गुरव, अरविंद माने,प्रवीण कांबळे,अंकुश कुंभार,आशिष मादनाईक यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *