इंडो किड्स शाळेमध्ये योग दिन उत्साहात साजरा

कबनूर -प्रतिनिधी
आरोग्याच्या संपन्नतेला साद देत स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटी संचलित इंडो किड्स शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अवचित्य साधत 21 जून ला विविध अंगी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.

शाळेच्या संगीत शिक्षिका सौ .सुषमा सुतार यांनी संस्कृत श्लोक वदन करून योग दिनाची सुरुवात केली. संस्कृतीची ओळख असलेल्या योगसाधनेला जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचे आवाहन यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री. एन .एन .काझी यांनी केले.
मुख्याध्यापिका सौ. नाझिया नवाब यांनी विद्यार्थ्यांना योगाचे मार्गदर्शन केले.

शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी अप्रतिम प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले ,यावेळी शाळेचे मैदान गर्दीने फुलून गेले होते .शाळेचे क्रीडा शिक्षक महेश पारसे यांनी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांच्याकडून संपूर्ण योगाचे प्रकार करून घेतले.

Advertise

अत्यंत उत्साहात विद्यार्थी वर्ग, शिक्षक वृंद यामध्ये आपला सहभाग नोंदवला . यावेळी आपले मन शरीर व आत्मा निरोगी राहण्यासाठी सर्वांनी दररोज योगासन करण्याची प्रतिज्ञा केली.

कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन श्री. एन .एन .काझी सेक्रेटरी समीरा पिरजादे ,मुख्याध्यापिका नाझिया नवाब ,व सर्व शिक्षक वृंद ,विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *