कबनूर मधील जुगार अड्ड्यावर शिवाजीनगर पोलिसांची धाड

कबनूर-प्रतिनिधी
कबनूर मधील लक्ष्मी माळ येथील,बाबू मुल्ला यांच्या घरालगत, उघड्यावर जुगार खेळणाऱ्या सात जणांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून,त्यांच्याकडून सुमारे 65 हजार 910 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये सुभान खलिफा (रा.फकीर मळा जवाहर नगर) सैफुद्दीन मोहम्मद मुजावर (लक्ष्मी माळ कबनूर),रफिक बंदगीसाब कुडची,राजू कुडची ,चौडाप्पा कुंभार,रियाज कुडची (स्वामी मळा),चांद तांबोळी (फकीर मळा) यांचा समावेश आहे.

Advertise

कबनूर मध्ये लक्ष्मी माळ परिसरात तीन पानी जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.याठिकणी शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकून 7 जणांना ताब्यात घेतले आहे.याबाबतची फिर्याद पो.कॉ.पवन गुरव यांनी दिली आहे.अधिक तपास पोलीस उप निरीक्षक मनोज पाटील हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *