इचलकरंजी-शैलेंद्र चव्हाण
माहेश्वरी युथ फॉउंडेशन च्या वतीने, डॉ बापूजी साळुंखे गर्ल्स हायस्कूल येथे, ” माय सायकल बँक ” ची सुरवात करण्यात आली.
ज्या शालेय विद्यार्थिनी, खेळाडू, आर्थिकदृष्टीने दुर्बल आहेत त्यांना नवीन सायकल देऊन, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा व त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी हा उपक्रम गेल्या २ वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे.
माय फौंडेशन ने प्रथम माय सायकल बँकची स्थापना, कन्या महाविद्यालय येथे केलेली असून त्याचा लाभ, विद्यार्थिनींना होत आहे.
यावेळी सदस्य संजय रांदड, प्रफुल्ल बलदवा, सुशील करवा, मधुसूदन मालपानी, शेखर बांगड, माय सायकल कमिटी सदस्य बालाप्रसाद भुतडा, उज्ज्वल भुतडा तथा गर्ल्स हायस्कूल च्या प्रिंसिपल सौ यु.एस. पोवार, हणमंत पवार, पालकवर्ग व शाळेच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.