जैन मुनींची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करा,जैन साधू साध्वीना संरक्षण द्या-समस्त जैन समाजाची मागणी

इचलकरंजी-शैलेंद्र चव्हाण
चिक्कोडी तालुक्यातील हिरेकुड येथील नंदीपर्वत आश्रमाचे जैन मुनी कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येचा निषेध नोंदवून जैन साधू आणि साध्वींना पूर्ण संरक्षण देणेची मागणी प्रांताधिकारी मोसमी बर्डे – चौगुले यांच्याकडे इचलकरंजीतील समस्त जैन समाजाच्या वतीने करणेत आली.

इचलकरंजी येथील प्रांत कार्यालय येथे इचलकरंजीतील सर्व जैन समाजाचे बंधू व भगिनी एकत्र येऊन निषेध नोंदवून निवेदन दिले. या निवेदनात जैन समाज मुलत: अहिंसावादी व शांतताप्रिय आहे. अशा जैन समाजाचे साधू (मुनी) प.पू.मुनिश्री १०८ कामकुमारनंदीजी महाराज यांची हिरेकुडी ता.चिक्कोडी जि.बेळगांव (कर्नाटक) येथे निर्घुण हत्या झाली. या घटनेचा सकल जैन समाज इचलकरंजी जाहीर निषेध करीत आहे.

या घटनेमुळे शांतताप्रिय व अहिंसावादी जैन समाजामध्ये तिव्र अक्रोश असून या घटनेचा तिव्र शब्दात निषेध करावा तेवढा थोडा आहे. या क्रुर घटनेमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना अत्यंत कठोर शिक्षा व्हावी व पुन्हा कोणलाही अशी घटना करताना कायद्याचा वचक बसावा यासाठी तत्काळ फास्ट ट्रॅकवर या आरोपींना शिक्षा होण्यासाठी उपाययोजना करावी अशी विनंती महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारला करावी अशी मागणी करणेत आली आहे.

जैन साधू व साध्वींच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. विहार करताना जाणीवपूर्वक वाहन अंगावर घालणे, साधूंना इजा पोहचवणे इ.प्रकार यापूर्वीही घडले आहेत. संपूर्ण भारत देशामध्ये आता याबाबत गंभीर विचार होऊन हजारो वर्षांची धार्मिक परंपरा व आधार असलेल्या साधू आणि साध्वींना पूर्ण संरक्षण दिले गेले पाहिजे अशी मागणी आपल्या मार्फ त आम्ही सरकारकडे करीत आहोत असे या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी स्वप्निल आवाडे, चंद्रकांत पाटील, गुंडाप्पा रोजे, उदय चौगुले, आमप्रकाश छाजेड, विजय गिरमल, राजेंद्र शहा, ओमप्रकाश छाजेड, प्रकाशचंद राठोड, ऋिषभजी छाजेड, रमेश जैन, ओमप्रकाश पाटणी, सुभाष बलवान, रवींद्र पाटील, बी.एम.पाटील, सौ.शशिकला बोरा, शितल पाटील, अनिल बमन्नावर, बाबासो हुपरे, उत्तम आवाडे, सुधाकर मणेरे, रवि आवाडे, अशोक पाटणी, अभिजीत पटवा, संजय मगदुम, प्रकाश चौगुले, श्रेणीक मगदुम, विकास चौगुले, मोहन चौगुले, वीरसेवा दल इचलकरंजी, वीज सेवादल जैन बोर्डिंग, जैन समाज कबनूर, कोरोची, शहापूर येथील भ.महावीर जयंती उत्सव मंडळ, इचलकरंजी येथील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विश्वहिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *