काँग्रेसची जनसंवाद यात्रा उद्या कबनूर मध्ये,
माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील जनतेशी साधणार संवाद

कबनूर-प्रतिनिधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेला मिळालेल्या प्रतिसादामुळे नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये जनसंवाद पदयात्रा सुरु केली आहे.त्याच अनुषंगाने,माजी पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यात सर्व तालुक्यात ‘जनसंवाद’ पदयात्रा सुरु आहे.सदरची जनसंवाद पदयात्रा उद्या दिनांक ११-सप्टेंबर-२०२३ रोजी दुपारी 5 वाजता कबनूर शहर काँग्रेस कमिटी येथे येत आहे.

यात्रेचा मार्ग महादेव मंदिर गावभाग ,कबनूर,हनुमान मंदिर ,
ग्रामदैवत जंदीसो ब्रॉनसो दर्गा ,देशभक्त रत्नापान्ना कुंभार चौक पल्लवी फोटो स्टुडिओ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,
इंडो किड्स स्कुल,शाहू पुतळा,श्री शिवतीर्थ,गांधी पुतळा ते
समारोप सभा राजवाडा चौक इचलकरंजी येथे होणार आहे.

जनसंवाद पदयात्रेचा मुख्य हेतू लोकभावना जाणून घेणे हा आहे , यात्रेदरम्यान महागाई ,बेरोजगारी ,महिलांवरील अत्याचार ,शेतकऱ्यांशी सबंधित मुद्दे,सर्व क्षेत्रातील असंघटित कामगार आणि स्थानिक पातळीवरील विविध मुद्याबाबत लोकांशी संवाद साधण्यात येणार आहे. तरी या जनसंवाद यात्रेत आपल्या समाजाच्या ,गावच्या व इतर कोणत्याही विकासात्मक ,शासकीय मागण्या प्रलंबित असतील तर त्या लेखी स्वरूपात घेऊन येऊन कोल्हापूर चे माजी पालकमंत्री ,माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याशी पदयात्रेत संवाद साधावा असे आवाहन कबनूर काँग्रेस अध्यक्ष अरुण गीते,व माजी उपसरपंच उदय गिते यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *