जालना येथील लाठीमाराच्या निषेधार्थ कबनूरात कडकडीत बंद,मुख्य चौकात केली जोरदार निदर्शने

कबनूर-प्रतिनिधी
कबनूर (ता. हातकणंगले )येथे सोमवारी सकाळी 9.30 वाजता येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार चौकातील,दर्ग्याचे कट्ट्यावर समस्त मराठा समाज व महाविकास आघाडी,स्वाभीमानी शेतकरी संघटना,शिवसेना (ठाकरे गट),दलित पँथर,मुस्लीम समाज आदिंच्या वतीने निदर्शने करण्यात आली.सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या.

मनोगत व्यक्त करून आंदोलनाला जाहीर पाठींबा देताना माजी उप सरपंच निलेश पाटील

जालना येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरु असलेल्या शांततामय आंदोलन करणाऱ्या लोकांवर अमानुष लाठीमार केलेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला.यावेळी अनेकांनी आपला पाठींबा जाहीर केला.यावेळी मनोगत व्यक्त करण्यात आली.आंदोलकांनी काळ्या फिती लावून,तसेच हातात काळे झेंडे घेऊन निषेध व्यक्त केला.

निदर्शने करताना आंदोलक

यावेळी सुधाकरराव मणेरे, मिलिंद कोले, आशोक पाटील,निलेश पाटील,रविंद्र पाटील,युवराज पाटील, अल्ताफ मुजावर,दिपक नरंदेकर, दत्ता पाटील,ग्रा.पं. सदस्या सौ अर्चना पाटील,सौ वैशाली कदम,दत्ता शिंदे, प्रशांत जगताप,शांतीनाथ कामत, हुसेन मुजावर,मेहबूब मुल्ला,अजित खुडे,आदी उपस्थित होते.

इचलकरंजी विभागाचे डी.वाय. एस.पी.समिरसिंह साळवे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार,हे फौजफाट्यासह आंदोलनस्थळी हजर होते.

खासदार दुसऱ्या रस्त्याने कार्यक्रमस्थळी
कबनूर जलजीवन योजनेच्या जलकुंभ पायाभरणी कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने येणार होते.त्यांना चौकात काळे झेंडे दाखवण्यात येणार होते.यासाठी सुमारे तासभर आंदोलक वाट बघत होते.मात्र खासदार माने मुख्य रस्त्याने न येता दुसऱ्या रस्त्याने आले.त्यामुळे आंदोलकांतून अधिक संताप व्यक्त केला जात होता.

दादा आलेच नाहीत

मंत्री चंद्रकांतदादा पाटील हेही जलजीवनच्या कार्यक्रमाला येणार होते.त्यांच्या अमृतहस्तेच कार्यक्रम संपन्न होणार होता.मात्र तेही या आंदोलनामुळे कार्यक्रमाला आलेच नाहीत.अशी चर्चा गावात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *