इचलकरंजी/शैलेंद्र चव्हाण
कबनूर दत्तनगर येथील झालेल्या चोरीचा तपास करत असताना शिवाजीनगर पोलीस पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एका रेकॉर्डवरील गुन्हेगारासह तिघांना अटक करून त्यांच्याकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यासह दोन मोटरसायकली,एक होम थेटर असा सहा लाख 24 हजार 500 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याप्रकरणी संशयित प्रेमचंद उर्फ टल्या राहुल कांबळे (वय 19) राजू फैजल काळे दोघे रा. दावत नगर कबनूर (वय 40) रोहन नारायण पवार (वय 20) रा. लक्ष्मी माळ कबनूर यांना अटक केली आहे.

यातील राजू काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर गांधीनगर पोलीस स्टेशन मध्ये 11 गुन्हे दाखल आहेत. या संशयित आरोपींना 5 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आहे.
याबाबत डीवायएसपी समीरसिंग साळवे व शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक राजू तासीलदार यांनी माहिती दिली.
मोहिदिन बापूलाल मारूफ यांच्या बंद घराचा कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यानी घरातील सोन्या-चांदीचे साहित्य दागिने चोरून नेले होते.याबाबत मारूफ यांनी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली होती.या चोरीचा तपास करताना संशयित टल्या उर्फ प्रेमचंद राहुल कांबळे,राजू काळे व रोहन पवार यांना अटक करण्यात आली.त्यांच्याकडून शिवाजीनगर, हुपरी,हातकणंगले या पोलीस ठाण्याकडील पाच गुन्हे उघडकिस आले आहेत.त्यांच्याकडून सहा लाख 24 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या संशयितांकडे आणखी चौकशी सुरू असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, डी वाय एस पी समीरसिंह साळवे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार,उपनिरीक्षक मनोज पाटील,अंमलदार सुनील बाईत, विजय माळवदे,प्रवीण कांबळे, सुकुमार बरगाले,सतीश कुंभार, पवन गुरव,अरविंद माने यांनी केली.