महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट इचलकरंजी शाखेच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साहात संपन्न

इचलकरंजी-प्रतिनिधी
इचलकरंजी (ता.हातकणंगले)येथील महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट यांच्यावतीने सालाबादप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा,मारुती काटाळे यांच्या घरी दत्त नगर शहापूर येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

इचलकरंजी शाखेचे कार्याध्यक्ष बाबुराव डाकरे यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाच्या फोटोचे पूजन करण्यात आले.तर पूजेचे यजमानपद सौ,व श्री चंद्रशेखर पोरे यांनी स्वीकारले.यानंतर ह.भ.प.श्री श्रीधर बापू सुतार इचलकरंजी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.यानंतर रात्री १२ वाजता जन्मकाळ सोहळा संपन्न झाला.यानंतर पुष्पवृष्टी व सुंठवडा वाटप करण्यात आले.


यावेळी कार्याध्यक्ष बाबुराव डाकरे, मारूती डाकरे,संजय चिले,मोहन दाभोळकर,मारूती काटाळे, शामराव काटाळे,महादेव शिंदे,संजय हाणफोडे, सुनील करपे, एकनाथ डाकरे,विष्णू शिंदे,अजित लटके, शाम शिंदे, शंकर महाडीक,दिलीप महाडीक,सतिश गावकर,अशोक महाडीक,दामोदर हाणफोडे,नामदेव शिंदे,यशवंत शिंदे,सुनील म्हाबळे, प्रभाकर पंदारे,रविंद्र पोरे,रघूनाथ शिंदे तसेच सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *