संजीवन विद्यामंदिर मध्ये तृणधान्य पाककृती स्पर्धा संपन्न

चंदूर-प्रतिनिधी
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेतंर्गत बदलत्या जीवनशैलीत जंकफूड खाण्याच्या सवयीमुळे आपल्या आहारातून पौष्टिक तृणधान्यांचा वापर कमी होत चालला आहे.पौष्टिक तृणधान्यांचा उपयोग आपल्या रोजच्या ऊर्जेच्या गरजा भागवण्यासाठी आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच तृणधान्ययुक्त आहाराची सवय लावणे आवश्यक आहे.याचसाठी तृणधान्ययुक्त खाद्यपदार्थांचे दैनंदिन जीवनात महत्त्व व निरोगी शारिरीक जीवनासाठी उपयोग विद्यार्थी,पालक,ग्रामस्थ यांना व्हावा याकरिता,तृणधान्य पाककृती स्पर्धा संजीवन शाळेत आयोजित करणेत आली होती.

सदर स्पर्धेमध्ये प्रथम क्र.सौ.प्रेरणा राणे,द्वितीय क्र.सौ.गायत्री खटावकर, तृतीय क्र.रूपाली परीट,चतुर्थ रूपाली पोलिस या मातापालकांनी पटकावला.तसेच स्वप्नाली नलवडे,नंदा माने,देवयानी पाटील,मनिषा केसरकर,प्रियंका माने,धनश्री जाधव,कृशदबी मोमीन,करिश्मा मुजावर,रेश्मा पठाण,संगिता कांबळे, सरस्वती कांबळे,सविता भाकरे,पूजा मस्कर,पूजा पोवार,गायत्री खटावकर,रेश्मा पुजारी,सरिता चौगुले,जयश्री सपकाळ,रुपाली परीट,स्नेहा सूर्यवंशी,प्रेरणा राणे,दिपा जाधव,अपर्णा कांबळे,अर्चना शिंदे,मेघा पोवार,माधुरी कुंभार,पूजा मंगसुळे,तबसूम मुल्ला, संपदा कांबळे,सीमा कुकडे,अरिना पेंढारी,मिनाज पेंढारी, प्रियांका चव्हाण तसेच विद्यार्थी स्मित कांबळे, साईराज सनदी,आबुजर मकानदार, पूर्वा पोलीस,वैष्णवी फरांडे,अमृता बोडके,त्रिवेणी वाले इत्यादींनी ऊस्त्फूर्त सहभाग नोंदवला.

सदर स्पर्धेचे नियोजन संजीवन शाळेतील सर्व शिक्षिका व मुख्याध्यापक पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

Advertise

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *