इचलकरंजीत सुरू होणार आरटीओ ऑफिस,आमदार आवाडे यांच्या प्रयत्नाला यश

इचलकरंजी-प्रतिनिधी

प्रदीर्घकाळापासून इचलकरंजीकरांना प्रतिक्षा असलेले उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.इचलकरंजीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्यास राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. इचलकरंजी शहरात स्वतंत्र्य आर टी ओ कार्यालय सुरू होणार या संदर्भातील अध्यादेश आठवडाभरात जारी होऊन 10 जूनपर्यंत हे कार्यालय सुरु होईल,अशी माहिती आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.त्यामुळे लवकरच नवीन आरटीओ नोंदणी क्रमांकही वस्त्रनगरीला मिळेल,असेही ते म्हणाले.

या कार्यालयामुळे इचलकरंजीला जिल्हास्तरीय दर्जा प्राप्त होणार आहे.तसेच हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.

यावेळी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, क.आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे, मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ राहुल आवाडे, प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, अरुण आवळे, महावीर कुरुंदवाडे, सचिन हेरवाडे, नरसिंह पारीक, राहुल गाट, अनिल शिकलगार यांच्यासह ताराराणी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *