महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि. २५) दुपारी २ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.
पुणे, कोल्हापूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. कोल्हापूर विभागातून १ लाख २० हजार ७९० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. कोल्हापूरमधून ५० हजार ६४६, सातारामधून ३६ हजार ८७, सांगलीमधून ३४ हजार ५७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.एकूण १७० परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडल्या.
निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ mahresult.nic.in,
https:///hsc.maharesults.org.in, http:///hscresult.mkcl.org या संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे.