इचलकरंजी-(शैलेंद्र चव्हाण)
येथील बडबडे हॉस्पिटल नजीक राहणाऱ्या,अनिल विठ्ठल कुलकर्णी यांच्या घराचे कुलूप तोडून,अज्ञात चोरट्याने सुमारे एक लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची फिर्याद अनिल कुलकर्णी यांनी इचलकरंजी पोलिस ठाण्यात दिली आहे.
यामध्ये 67 हजार रुपये रोख रक्कम,चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण,1000 रुपये चांदीचे पैंजण यांचा समावेश आहे.सदर घटना 3 जून रोजी रात्री च्या सुमारास घडली असून,याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत मुळीक हे करत आहे.
येथील अष्टविनायक कॉलनी, साईप्रसाद रेसिडेन्सी येथे अज्ञात चोरट्याने सुमारे 2 लाख 14 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची फिर्याद राजीव डागा यांनी इचलकरंजी पोलीस ठाण्यात दिली आहे.
यामध्ये 1 लाख 12 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन,92 हजार रुपये किमतीची सोन्याचे बांगडी, 5 हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल,तसेच तीन हजार रुपये किमतीचा नोकिया मोबाइल यांचा समावेश आहे .तर 2 हजार रुपये किमतीचे घड्याळ असा सुमारे 2 लाख14 हजार रुपये चा मुद्देमाल लंपास केला आहे.अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक गाढवे करत आहेत.