मोबाईल चोरट्यास शहापूर पोलिसांनी केले जेरबंद,44 हजारांचा मुद्देमाल जप्त

शहापूर-शैलेंद्र चव्हाण
शहापूर पोलीस ठाण्याचे हद्दीत, मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यास पकडून,चोरीस गेलेले सुमारे पाच मोबाईल हस्तगत करण्यात शहापूर पोलिसांना यश आले असून, याप्रकरणी संशयित कैलास चंद्रकांत बागे (वय.व.35) राहणार कोळी गल्ली,उमळवाड,शिरोळ यास अटक करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की यातील फिर्यादी प्रवीण रामभाऊ पवार,(रा. तारदाळ) यांचे राहते घरातून,फेब्रुवारी महिन्यात मोबाईल चोरीस गेले बाबत फिर्याद दाखल करण्यात आली होती.

याबाबत तपास करत असताना पोलीस अंमलदार यांना,एक संशयित चांदणी धाबा तारदाळ येथे चोरीचे मोबाईल फोन विक्री करण्यास येणार असल्याचे समजले.याबाबत बातमीची खात्री करून,पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली,गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी सदर ठिकाणी सापळा लावला.त्या ठिकाणी कैलास बागे नामक युवकास ताब्यात घेऊन चौकशी केली असता,त्याने मोबाईल चोरी करून विक्री करता आणले असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे ४४००० रुपये किंमतीचे, पाच अँड्रॉइड मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.


सदर कारवाई शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके,गुन्हे शोध पथकाचे पोलिस अंमलदार अविनाश मुंगसे,असिफ कलयगार,अर्जुन फातले,रवींद्र महाजन,संतोष कांबळे यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *