कोल्हापूर-प्रतिनिधी
शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई दिलीपकुमार जाधव यांनी नुकतेच ७५ व्या वर्षात पदार्पण केले.आणीबाणी काळात महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळातील लॅब केमिस्ट ची सरकारी नोकरी सोडून देशात क्रांती येणार या भावनेतून आणीबाणी विरोधी लढ्यात भाई दिलीपकुमार जाधव यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सक्रिय सहभाग घेतला.त्यावेळी ते एस एम जोशी यांच्या समाजवादी विचारांनी प्रेरित होऊन पुरोगामी विचारांच्या चळवळीत सक्रिय झाले. त्यावेळेपासून आजतागायत भाई दिलीपकुमार जाधव यांनी शेतकरी कामगार पक्षाशी एकनिष्ठ राहून आयुष्यभर पुरोगामी विचार आचरणात आणला.त्यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त शेतकरी कामगार पक्षाचे कोल्हापूर शहर चिटणीस भाई बाबुराव कदम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना भाई दिलीपकुमार जाधव यांनी सांगितले की पूर्वी आणीबाणीच्या काळात देशातील जनता एकवटली होती.आज देशात अघोषित हुकूमशाही आहे, समाजात जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याच काम सुरु आहे. या सर्वाविरोधात लढण्याची जबाबदारी शेतकरी कामगार पक्षाची आहे,यासाठी सर्वांनी शेकापच्या नेतृत्वाखाली एकत्रित यावे.
यावेळी ऑनररी लेफ्टनंटपदी पदोन्नती झाल्याबद्दल शिवाजी शेटके यांचा शेकाप च्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाई डॉ. संदेश कचरे होते. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक भाई सचिन जाधव, पाहुण्यांचा परिचय इंजि. अभिजीत कदम यांनी केला.
यावेळी सौ. प्रमोदिनी जाधव, अस्लम बागवान, राम ठोंबरे, प्रकाश शिंदे, सौ. गीता जाधव, सौ. प्रिया जाधव, पीटर चौधरी, रविंद्र मोरे, चंद्रकांत खोंद्रे, चंद्रकांत सूर्यवंशी, मधुकर हरेल, लखन मुल्लानी, प्रीतम बंदसोडे, फर्जाना नदाफ, उमाजी सनदे, विश्वजित देवकर, शीतल पोवाळकर, दमयंती कडोलकर, अमित जाधव, राहुल जाधव, सुनिल जाधव आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.आभार सौ. वैशाली सूर्यवंशी यांनी मानले