पंचगंगा साखर कारखान्याची वार्षिक सभा खेळीमेळीत…

कबनूर-टिपू सनदी
येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची सन २०२२-२३ या सालची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. विषय पत्रिकेतील सर्व विषय सभासदांनी टाळ्याच्या गजरात व आवाजी मतदानाने मंजूर केले. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन पी. एम. पाटील होते.

देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या समाधी स्थळी अभिवादन करताना चेअरमन पी.एम.पाटील व संचालक व रेणुका शुगरचे पदाधिकारी

प्रथम संस्थापक चेअरमन स्व. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. कारखान्याचे प्र. का. संचालक एन. वाय. भोरे यानी विषय पत्रिकेचे वाचन केले. यावेळी पी. एम. पाटील यांनी स्वर्गीय रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. ते पुढे म्हणाले, चालू वर्षी कमी पावसामूळे ऊसाचा तुटवडा जाणवणार आहे. कारखान्याने दरवर्षी उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम राखली आहे. त्यामुळे सभासद व शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कारखान्यास गळीतास पाठवून सहकार्य करावे. तसेच आपल्या देशातील शास्त्रज्ञांनी “चांद्रयान ३” ही अंतराळ मोहीम यशस्वी केली. त्याबद्दल सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदनाचा ठराव सभेत करणेत आला.

वार्षिक सभेत बोलताना चेअरमन पी.एम.पाटील व व्यासपीठावर उपस्थित संचालक

यावेळी व्हा. चेअरमन जयपाल कुंभोजे, संचालक धनगोंडा पाटील, कुमार खूळ, एम. आर. पाटील, सुनिल तोरगल, प्रमोद पाटील, प्रताप ऊर्फ बाबा पाटील, प्रताप नाईक, प्रकाश खोबरे, संतोष महाजन, भूपाल मिसाळ, सौ. रंजना निंबाळकर, सौ. शोभा पाटील यांचेसह सभासद उपस्थित होते. संचालक रावसाहेब भागाटे यानी आभार मानले.

समाधीस्थळी अभिवादन करताना मान्यवर

निमशिरगाव ता. शिरोळ येथील सरपंच, उपसरपंच व सभासदांनी स्व. रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे स्मारकासाठी टनास रु. १०/- द्यावेत अशी मागणी केली. यावेळी चेअरमन पी. एम. पाटील यानी जे ऊस पुरवठादार कपातीस लेखी मान्यता देतील त्यांच्या ऊसबिलातून रक्कम कपात करुन ती संबंधित ट्रस्टला देणेबाबत रेणुका शुगर्सला कळवू असे सांगितले.

गतवर्षीच्या ऊसाला एफआरपी पेक्षा टनाला रु. ४००/- अधिक मिळावेत. त्याचप्रमाणे कारखान्याने खुल्या साखरचे दर वाढवावेत व इतर मागण्याचे आलेले शेतकरी व इतर संघटनांचे निवेदन कार्यवाही साठी रेणुका शुगर्सला पाठवू असे. पी. एम. पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *