कबनूर -प्रतिनिधी
सध्या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू असून या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक सही संतापाची ही मोहीम कबनूर मध्ये राबवण्यात आली.त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा गट फुटून भाजपा मध्ये गेला,यापूर्वी शिवसेना पक्ष फुटला.या सर्व राजकारणातील घोडेबाजारा बाबत जनतेत तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यभर “एक सही संतापाची” ही मोहीम राबवली जात आहे.

राजकारणाचा चिखल झाला आहे काय?माझ्या मताला काही किंमत नाही काय?याचा तुम्हाला राग येत नाही का, संताप येत नाही का?..जर याचा तुम्हाला संताप येत असेल तर एक सही संतापाची ..या आशयाचा डिजिटल फलक लावला होता.त्यावर नागरिक,विविध पक्षाचे पदाधिकारी,पत्रकार यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

यावेळी मनसे सहकार सेना जिल्हाध्यक्ष मनोहर जोशी,तालुका उपाध्यक्ष शहाजी भोसले, शहराअध्यक्ष अभिषेक केटकाळे,विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष रोहित कोटकर, शैलेश कवडे,तेजस राणे,विजय पाटील,राजेंद्र राणभरे,प्रवीण बोरगले,आदी उपस्थित होते.