इचलकरंजी शहर स्वच्छ करा अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करणार-आयुक्त ओमप्रकाश दिवटे

इचलकरंजी-शैलेंद्र चव्हाण
महानगरपालिकेचे नुतन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी महानगरपालिकेच्या सभागृहात आज सोमवार दि.१० रोजी बैठक घेऊन महानगरपालिका आरोग्य विभागाचा आढावा घेतला.

सदर बैठकीमध्ये मा. आयुक्त यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर येत्या आठवड्यात संपूर्ण शहराची स्वच्छता, सारण गटारींची स्वच्छता, सार्वजनिक मुतारी, शौचालयांची स्वच्छता, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त, डास निर्मुलनासाठी औषध फवारणी, बंदी असलेले प्लॅस्टिक वापरावर कारवाई करणेचे आदेश आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांना दिले.त्याचबरोबर शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी निगडित सदर विषय अत्यंत महत्त्वाचा असलेने सर्वांनी गांभीर्याने स्वतःवर सोपवलेली जबाबदारी पार पाडावी अशी सूचना केली .

तसेच या आदेशाचे अनुषंगाने शहरातील ज्या प्रभागांमध्ये अस्वच्छता आढळून येईल तसेच बंदी असलेले प्लॅस्टिक आढळून येईल त्या प्रभागातील संबंधित अधिकारी कर्मचारी तसेच आरोग्य अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करणेत येईल असा इशारा दिला.

आजच्या आढावा बैठकीस आरोग्य अधिकारी डॉ सुनिलदत्त संगेवार,महानगरपालिकेच्या चारही
विभागीय कार्यालयाकडील मुख्य स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, प्रभारी अधिकारी, मुकादम, स्वच्छता पर्यवेक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *