इचलकरंजीत प्रधानमंत्री जनऔषधी केंद्राचे उदघाटन

इचलकरंजी-शैलेंद्र चव्हाण

केंद्रशासनाने वस्त्रनगरीच्या आरोग्य सेवेत आणखी एक पाऊल पुढे टाकत प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र सुरू केले आहे. नागरिकांना कमी किमतीत औषधे उपलब्ध करून देणाऱ्या शहरातील या तिसऱ्या जनऔषधी केंद्राचे उद्घाटन वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, जनऔषधी गोवा आणि महाराष्ट्र राज्याच्या विपणन अधिकारी हिमानी नेगी, माजी नगराध्यक्षा सौ.अलका स्वामी, सेवा भारती रुग्णालयाचे प्रमुख भगतराम छाबडा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.यावेळी महिलांना सॅनिटरी नॅपकिन, पोषण प्रोटीन तसेच वृक्ष वाटप करण्यात आले.

Advertise

यावेळी बोलताना जनऔषधी अधिकारी हिमानी नेगी म्हणाल्या की,” जनऔषधी औषधांच्या उपलब्धतेमुळे लोकांवरील आर्थिक भार कमी होत आहे.हे औषध केंद्र सुरू झाल्यामुळे नागरिकांना दर्जेदार औषध माफक दरात मिळेल. जनऔषधी केंद्रात 1800 हून अधिक प्रकारची औषधे आणि सुमारे 285 शस्त्रक्रिया साहित्य उपलब्ध आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 16 केंद्रे कार्यरत आहेत. जनऔषधी केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना बाजाराच्या तुलनेत जनऔषधी औषधांपासून ५० ते ९० टक्के आर्थिक बचत होणार आहे. औषधांवर होणारा खर्च कमी करण्यासाठी दर्जेदार जेनेरिक औषधांसाठीचे हे केंद्र गरिबांना मोठा दिलासा देणार आहे.”

Advertise

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम केले आहे. केंद्रशासनाच्या विविध आरोग्यदायी योजना नागरिकांना लाभदायक आहेत. याबरोबर प्रधानमंत्री जनऔषधी औषधांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्याचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन श्री.स्वामी यांनी केले.यावेळी श्री.छाबडा,सौ.स्वामी यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत कु. अस्मिता पाटील यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रंसंचलन डॉ. अभिजित पाटील यांनी केले.

यावेळी विरशैव सहकारी मल्टीस्टेट बँकेचे चेअरमन अनिल स्वामी, डी.जी. कोरे, प्रकाश दत्तवाडे, बाबासाहेब पाटील, विलास गाताडे, डी.एम. बिरादार, मुकुंद माळी, सूरेश पाटील, किशोर पाटील, मलकारी लवटे, उमेश पाटील, सुप्रिया मजले, पुनम जाधव, अश्विनी कुबडगे, डॉ. सुनंदा पाटील, डॉ. श्रेया पाटील आदी उपस्थित होते.आभार बाळासाहेब पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *