हातकणंगले-रोहन कदम
एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर देशात साजरा होत असलेल्या राष्ट्रीय पोषण सप्ताह निमित्त, सेंट पॉल इंटरनॅशनल स्कूलने जनजागृतीपर एक सुंदर कार्यक्रम इचलकरंजी येथील फोरच्युन मॉल येथे सादर केला.यावेळी नामांकित डॉक्टर अमित राठी यांची प्रमुख उपस्थिती होती.

शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य व वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या गाण्यावर नृत्य सादर केले.उपस्थित लोकांना आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरा होत असल्याची माहिती दिली.ज्वारी, नाचणी व बाजरीचा दैनंदिन आहारामध्ये समावेश करण्याबद्दल आवाहन केले.

शाळेच्या या उपक्रमाचे डॉक्टर राठी व जमलेल्या लोकांनी खूप कौतुक केले.या कार्यक्रमावेळी शाळेचे सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.शाळेच्या मुख्याध्यापिका, सौ वर्षा मदभाविकर व उप मुख्याध्यापिका सौ परिमला कुंभोजकर यांनी पाहुण्यांचे व पालकांचे स्वागत केले.या विशेष कार्यक्रम साठी संस्थेचे चेअरमन श्री राजकुमार राव व सेक्रेटरी श्री महेश राव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.