कबनूर जल जीवन योजनेचा जलकुंभ व पायाभरणी समारंभ संपन्न

कबनूर-प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून हर घर नल हर घर जल ही योजना संपूर्ण देशात राबवण्याचा संकल्प आहे.या संकल्पनेतून गावोगावी ही योजना प्रत्यक्षपणे सुरू आहे.त्यामुळे नागरिकांना याचा चांगला फायदा होणार आहे असे प्रतिपादन खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांनी केले.ते येथील जलजीवन मिशन नळ पाणीपुरवठा योजना समितीच्यावतीने मराठी शाळा परिसरात उभारण्यात येणाऱ्या जलकुंभ भूमिपूजन व पायाखुदाई शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.अध्यक्षस्थानी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी.एम.पाटील होते.

भूमिपूजन करताना मान्यवर

खासदार धनंजय महाडिक,खासदार धैर्यशील माने,आमदार प्रकाशराव आवाडे,माजी आमदार सुरेशराव हाळवणकर,माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे,सुधाकरराव मणेरे,जलजीवन समिती अध्यक्ष सौ शोभा पोवार,यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

ग्रामपंचायत सदस्या सुलोचना कट्टी व संजय कट्टी यांचे हस्ते पूजा करण्यात आली.जलजीवन योजनेसाठी लागणारा संपूर्ण निधी शासनाकडून मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू आणि त्यातील त्रुटी दूर करून हा चांगला प्रकल्प पूर्णत्वास नेऊ या.असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले.आमदार आवाडे म्हणाले,कबनूर जलजीवन योजनेसाठी २९ कोटीच्या मंजूर योजनेत त्रुटी आहेत.जनतेवर कुठल्याही प्रकारचा बोजा पडू नये यासाठी नव्याने २२ कोटीचा पुरवणी प्रस्ताव पाठवला आहे.याला मान्यता मिळवून देण्याचं काम हे आमच्या सर्वांचे आहे.ते लवकर पूर्ण करणार असे प्रतिपादन केले.

प्रास्ताविक संचालक प्रमोद पाटील यांनी केले.यावेळी हिंदुराव शेळके,सरपंच शोभा पोवार, उपसरपंच सुनील काडाप्पा,बी.डी.पाटील,नितीन जांभळे ,बबन केटकाळे,बी. डी.पाटील,जंबा पाटील,जयकुमार काडाप्पा,ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग,मंडल अधिकारी राजू बावणे,तलाठी एस.डी.पाटील,ग्रामपंचायत सदस्य यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *